Join us

Aditi Rao Hydari: राजघराणं, लग्न आणि घटस्फोट! 'असा' आहे अदिति राव हैदरीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:21 PM

अदितीचा जन्म हैदराबादमधील एका शाही कुटुंबात झाला. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हैदराबादचे पंतप्रधान होते.

बॉलिवूडच्या अनेक पिरियड चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी राजकन्यांची भूमिका साकारली आहे. त्यांचे चित्रपटांतील लूक पाहून असे वाटते की त्या खरोखरच राजघराण्यातील आहेत. पण आज आपण चित्रपटांबद्दल नाही तर खऱ्या राजकुमारीबद्दल बोलणार आहोत. हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीबद्दल. अदिती आज तिचा वाढदिवस साजरा करते. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी...

अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 साली हैदराबादमधील एका शाही कुटुंबात झाला. अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. तसेच अदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरा यांची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल राहिले आहेत. अदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वरा राव यांनी तेलंगणात वनपार्थीवर राज्य केले आणि शांता रामेश्वर राव हे हैदराबादच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञासमवेत ओरिएंट ब्लॅक्सन पब्लिशिंग हाऊसचे अध्यक्ष होते.

आदितीने आपले शालेय शिक्षण आंध्रप्रदेशमध्ये पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तिने भरतनाट्यमयचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रसिद्ध नृत्यागंणा लीला सैमसन यांची ती शिष्य आहे.अदितीची आई एक ठुमरी गायिका आहे.

अदितीने आपल्या करिअरची सुरुवात तमिळ 2007 साली आलेल्या श्रृंगारम चित्रपटातून केली. या चित्रपटाला तीन नॅशनल अ‍ॅवॉर्डदेखील मिळाले. अदितीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला तो राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी दिल्ली 6 या चित्रपटातून. मात्र अदितीली बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती 'ये साली जिंदगी' आणि 'रॉकस्टर' चित्रपटातून. ये साली जिंगदी चित्रपटात अदितीने आपल्या को-स्टारला तब्बल 22 वेळा किस केले होते. या कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता.

अदितीच्या पर्सनल लाईफबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तिने वयाच्या 21 वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. अदिती 17 वर्षांची असताना तिची ओळख सत्यदीपशी झाली होती त्यांनतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्न केलं आणि त्यानंतर 2013मध्ये एका मुलाखतीदरम्यान घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते.

टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटी