Join us

काम मिळवण्यासाठी काहीही, चक्क अनोळखी व्यक्तीसह 'या' अभिनेत्रीला करायला सांगितला होता SEX सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 14:28 IST

अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.

आकर्षण असलेल्या आणि एकदा तरी कामाची संधी मिळावी अशी चंदेरी दुनिया म्हणजे बॉलिवूड त्यासाठी अनेकजण संघर्ष करतात.रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी अनेक ऑडिशनवर ऑडिशन देतात. त्यामध्ये पण नशीबाने साथ दिली तर संधी मिळाली समजा. अभिनेत्री अदितीराव हैदरीने तिचा ऑडिशवेळी तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला होता. 

ऑडिशनवेळी तिला इंटिमेट सीन करण्यास सांगण्यात आले होते. अभिनयक्षेत्रात काम करायचे असेल कर ब-याचदा भूमिकेची गरज म्हणून असे सीन्स करावे लागतात इतपर्यंत ठिक होते.मात्र जेव्हा हा सीन तिला एका अनोळखी व्यक्तीसह करायचे आहे हे कळाल्यावर मात्र तिच्या पायाची खालची जमीनच घसरली होती. या सिनेमाचे नाव होते 'ये साली जिंदगी'. अदितीने ज्या व्यक्तीसह या सीनचे ऑडिशन दिले तो व्यक्ती होती. अभिनेता अरुणोदय सिंह. या अरुणोदयची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती.सध्या ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम करताना दिसत आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :आदिती राव हैदरी