Join us

'मणिरत्नम यांनी मला तोंड धुवून यायला सांगितलं', अदिती राव हैदरीने सांगितला सेटवरचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 18:13 IST

मणिरत्नम यांच्या सेटवर नक्की काय घडलं?

अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) नुकतीच संजय लीला भन्साळींच्या  'हीरामंडी' सीरिजमध्ये दिसली. सीरिजमधील तिचा गजगामिनी वॉक तर प्रचंड व्हायरल झाला. तसंच अदितीचं सौंदर्य, तिची फिगर यावर चाहते फिदा झाले. अदितीने दिलेला परफॉर्मन्स कौतुकास्पद होता. नुकतंच अदितीने युनिव्हर्सिटी द्वारे आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये वैयक्तिक आयु्ष्य आणि करिअरवर भाष्य केलं.

अदितीने बंगळुरु स्थित प्रेसीडेन्सी यूनिव्हर्सिटी 'अचीव्हर्स डायसॉग्स 2024'मध्ये सहभाग घेतला. यावेळी तिने उपस्थित विद्यार्थांशी संवाद साधला. तिने विद्यार्थ्यांना आपल्या मनाचं ऐका आणि स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा असा सल्ला दिला. एका अभिनेत्रीने नक्की कसं दिसायला हवं यावर ती म्हणाली, "अभिनेत्रीही एक माणूसच तर असते. मी मेकअप करत नाही. मला फारसा मेकअप करायला आवडतही नाही. मणिरत्नम यांच्यासोबत काम करतानाचा एक किस्सा सांगते. मी सेटवर मेकअप करुन आले होते. तेव्हा ते मला पाहून म्हणाले जा आणि तोंड धुवून ये. मी जेव्हा तोंड धुवून आले तेव्हा मलाही जाणवलं की अरे मी मेकअपशिवाय किती छान दिसते."

अदितीने 'हीरामंडी' सीरिजमध्ये बिब्बोजान ही भूमिका साकारली. सीरिजचा दुसरा भागही येणार आहे ज्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अदिती आगामी 'गांधी टॉक्स' मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अदितीने साऊथ अभिनेता सिद्धार्थशी साखरपुडा केला. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहे.

टॅग्स :आदिती राव हैदरीबॉलिवूडसिनेमा