यश राज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी भव्यदिव्य सोहळ्याची जी काही योजना आखली आहे त्याप्रमाणे सर्व काही झाले तर मुंबईला लवकरच वायआरएफ म्युझिअम मिळणार आहे. वायआयएफच्या 50 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा भाग म्हणून ही कल्पना मांडण्यात आली आहे. ख्यातनाम फिल्ममेकर यश चोप्रा यांच्या 88 व्या जन्मतिथीनिमित्त या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
"आदि सध्या वायआरएफ प्रोजेक्ट 50 च्या आराखड्यावर काम करत आहे. वायआरएफ म्युझिअमचे अनावरण करण्याची भव्य योजना या सोहळ्याचा भाग आहे, हे नक्की. सामान्य जनतेला या संग्रहालयात येऊन वायआरएफच्या वारशामध्ये स्वत:ला गुंतवण्याचा अनुभव घेता येईल. ज्यांनी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील फॉक्स लॉटसारख्या भव्य स्टुडिओजना भेट दिली आहे त्यांना हे कळू शकेल की इथे सगळा इतिहास, कपडे पट, दुर्मिळ पोस्टर्स, फोटो, व्हिडीओज किती भव्य स्वरुपात मांडण्यात आले आहेत. वायआरएफ म्युझिअमची रचना अत्यंत भव्य स्वरुपावर करण्यात येत आहे," असे सूत्रांनी सांगितले.
"वायआरएफचा संपन्न इतिहास, या स्टुडिओने भारतीय प्रेक्षकांना दिलेले अप्रतिम सिनेमे आणि भारतातील पॉप-संस्कृतीला या स्टुडीओच्या सिनेमांनी कसा आकार दिला हे पाहता कोणाच्याही लक्षात येईल की वायआरएफ म्युझिअम खऱ्या अर्थाने हिंदी सिनेसृष्टीतील महत्त्वाचे क्षण पुन्हा एकदा जीवंत करेल. हे संग्रहालय उभे राहील तेव्हा भारतीय सिनेरसिकांना आणि प्रेक्षकांना आजवर प्रकाशात न आलेल्या अनेक गोष्टी, अनेक आठवणींचा ठेवा गवसणार आहे," असे सुत्रांनी सांगितले.
मात्र, या सुत्रांनी दिलेलया माहितीनुसार संग्रहालय सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागणार आहे. "वायआरएफ म्युझिअम उभारणे हे आदिचे स्वप्न आहे. त्यामुळे 50 वर्षांच्या सोहळ्याचा भाग म्हणून यासंदर्भात घोषणा होणार, हे नक्की. पण, संग्रहालय उभे राहण्यास आणखी काही कालावधी जाईल. यात आणखी काही वर्षं जातील. पण, प्रेक्षकांना आणि हिंदी सिनेरसिकांना अखेर यश राज फिल्म्सचा इतिहास, त्यांनी तयार केलेले सिनेमे आणि पिढ्यानपिढ्या त्यांनी भारतीयांना दिलेल्या अनेक सुपरस्टार्सचा प्रवास अनुभवता येणार आहे, ही फारच छान बाब आहे. "