Join us

आदित्य रॉय कपूर अन् सारा अली खान यांच्या 'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या प्रदर्शनास विलंब; 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:12 IST

आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांची मुख्य भूमिका असलेला 'मेट्रो इन दिनों' चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहे.

Metro In Dino : आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांची मुख्य भूमिका असलेला 'मेट्रो इन दिनों' चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य आणि साराची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करनाता दिसणार आहे. 'मेट्रो इन दिनो'मध्ये आधुनिक काळातील आंबट-गोड नातेसंबंधांच्या कथांचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट २००७ आलेल्या 'लाईफ इन अ मेट्रो' चा सीक्वल असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान, 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले असून प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. त्यात आता एक नवीन अपडेट समोर येत आहे.  प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'मेट्रो इन दिनो' चे दिग्दर्शक अनुराग बसू आणखी एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनास उशीर होत असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा बहुप्रतीक्षित चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमात सारा आणि आदित्यसह अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकना सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग बसू सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला स्टार आगामी रोमॅंटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे त्याचा परिणाम 'मेट्रो इन दिनो'च्या प्रदर्शनावर होताना दिसतो आहे. त्याशिवाय चित्रपटातील काही सीन्स पुन्हा शुट करावे लागल्याचागही माहिती समोर आली होती.  २०२२ मध्ये या 'मेट्रो इन दिनो'ची घोषणा करण्यात आल्यानंतर सिनेरसिकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु आता देखील त्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

टॅग्स :आदित्य रॉय कपूरसारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा