Join us

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूरनं पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 15:54 IST

आदित्यने नुकतेच एका मुलाखतीममध्ये आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य केलं.

आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच आदित्य आपल्या वैयक्तिक कारणांमुळेही नेहमी चर्चेत असतो. नुकतेच आदित्यचं अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर नाव जोडलं गेलं होतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता आदित्यने नुकतेच एका मुलाखतीममध्ये आपल्या खाजगी आयुष्यावर भाष्य केलं. 

आदित्य रॉय कपूरने नुकतेच Lifestyle Asiला मुलाखत दिली. यावेळी त्याने  व्यावसायिक आणि खासगी जीवनावर भाष्य केलं. तो म्हणाला, ''माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच शांत राहिलो आहे. मला ते जसं आहे तसं आवडतं.  लोकांनी माझ्याबद्दल आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व काही जाणून घ्यावं, ही गरज मला कधीच वाटली नाही.  म्हणूनच मी सर्वकाही माझ्यापर्यंतचं ठेवतो. काही वायफळ गोष्टींमध्ये वेळ का वाया घालावा, असं मला वाटतं'

लोकांचं त्याच्याविषयी काय मत आहे, याबद्दल फरक पडत नसल्याचं त्यानं सांगितलं. यासोबतच आदित्य रॉय कपूरने तो सोशल मीडियावर सक्रिय नसल्याबद्दलही सांगितलं. तो म्हणाला,  'काही असेही लोक आहेत, ज्यांना तुम्ही आवडता, तर काही असेही असतात, ज्यांना तुम्ही आवडत नसता'. दरम्यान मे महिन्यात ETimes च्या रिपोर्टनुसार आदित्य आणि अनन्या पांडे हे मार्चमध्ये वेगळे झाले होते. दोघेही ब्रेकअपमधून सावरत असून आपल्या-आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :आदित्य रॉय कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडअनन्या पांडे