बॉलिवूडचा शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. हॅकरने अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोही बदलला होता आणि अमिताभ यांच्याऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसत होता. तसेच अकाऊंटवरून पाकिस्तानशी संबंधित मसेजही शेअर करण्यात आला होता. पण त्यांचे अकाऊंट रिकव्हर झाले असून अमिताभ यांनी त्यावर ट्वीट देखील केले आहे.
अमिताभ यांच्यानंतर प्रसिद्ध गायक अदनान सामीचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून त्याचा प्रोफाईल पिक्चर बदलण्यात आला आहे. आज सकाळी अदनानचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून त्याच्या प्रोफाईल पिक्चरच्या ऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसून येत आहे. तसेच त्याच्या प्रोफाईलवरची माहिती देखील बदलण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट टर्कीश सायबर आर्मीकडून हॅक करण्यात आले होते.
अदनानचे अकाऊंटदेखील अमिताभ यांच्या अकाऊंटप्रमाणेच हॅक झाले असून हे देखील टर्कीश सायबर आर्मीनेच हॅक केले आहे. अमिताभ यांच्याप्रमाणेच अदनानच्या अकाऊंटवर देखील पाकिस्तान संबंधित ट्वीट करण्यात आले आहेत.
अदानानकडून ट्विटरवर एक पोस्ट पिन करण्यात आली आहे. त्यामध्ये, माझ्या ट्विटर अकाऊंटवर सायबर अटॅक झाल्याचे त्याने म्हटले आहे. मी लोकांची माफी मागतो. मला अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे मला मदत करा... हॅकरने अदनानच्या अकाऊंटवर केलेले सगळे ट्वीट आता त्याने डीलिट केले आहेत.
अमिताभ यांनी अकाऊंट रिकव्हर झाल्यानंतर एक कविता ट्वीट केली असून ही कविता त्यांच्या चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. त्यांनी लिहिले आहे की, सिर्फ शब्दों से न करना,किसी के वजूद की पहचान
हर कोई , उतना कह नही पाताजितना समझता और महसूस करता है...
"express not just in words the existence of one ; not everyone has the capability to say what they understand and feel " ~ ab