Join us  

चाहत्यांना 'भाईजान'चं वेड! ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:41 PM

'टायगर 3' सिनेमाच्या तिकीटांची 5 नोव्हेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

अभिनेता सलमान खानचा 'टायगर 3'हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'टायगर 3' हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   'टायगर 3' सिनेमाच्या तिकीटांची 5 नोव्हेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाची 44 हजार 500 तिकिटे विकली गेली. याआधी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी 15 लाख तिकिटांची विक्री झाली होती.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला जबरदस्त सुरुवात झाली आहे.आपल्या ट्विटमध्ये त्यांनी निवडक शहरांच्या आगाऊ बुकिंगची माहिती दिली. अनेक शहरांमध्ये या चित्रपटाचे मॉर्निंग शो देखील आयोजित करण्यात आले आहेत. 

टायगर-3 हा यशराज स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. टायगर मालिकेतील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी 2012 मध्ये 'एक था टायगर' आणि 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान आणि कतरिनाशिवाय इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'टायगर-3' चित्रपटात शाहरुख खान छोट्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो पठाणच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी सलमानने शाहरुखच्या पठाण या चित्रपटात कॅमिओ केला होता. शिवाय, या चित्रपटात हृतिक रोशनचाही एक कॅमिओ असू शकतो. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसिनेमा