Join us

'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 13:18 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या आजीच्या सौंदर्याची तुलना अभिनेत्री रश्मिका मदान्नासोबत केली आहे. 

ॲड. गुणरत्न सदावर्ते हे कायम आपल्या बोलण्यावरुन चर्चेत असतात.  मराठा आरक्षण किंवा एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा असो गुणरत्न सदावर्ते कायम चर्चेत असतात. आता पुन्हा ते प्रकाशझोतात आले आहेत.  त्याला कारणही तसेच आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या आजीच्या सौंदर्याची तुलना रश्मिका मदान्नासोबत केली आहे. 

गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतेच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आजीच्या सौंदर्याचे खूपच कौतुक केले. ते म्हणाले, 'माझी आजी इतकी सुंदर होती की तिच्यापुढे  अभिनेत्री रश्मिका मंदान्ना म्हणजे काहीच नाही. रश्मिका माझ्या आजीपुढे पाणी कम चाय असे म्हणावे लागेल. एवढी माझी आजी सुंदर होती. अगदी रशियन मुलींप्रमाणे माझ्या आजीची उंची सहा फूट होती आणि आजी खूपच स्लिम होती'. 

पुढे ते म्हणाले, 'ती मला आडव्होकेट म्हणायची. तिला अ‍ॅडव्होकेट म्हणता यायचे नाही. तिला वाटायचे मी वकीलच झालो पाहिजे. कारण तिने तिची सगळी लेकरे तुरुंगात पाहिली. वकिलांना मान द्यावा लागतो हे तिला वाटायचं. आजीला आणि वडिलांना मी वकील व्हावे असे वाटायचे. तर आईची इच्छा मी डॉक्टर व्हावे अशी होती'

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मूळचे ते नांदेडचे आहेत. नांदेड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी  शिक्षण संभाजीनगर आणि मुंबईतून पूर्ण झाले आहे. नांदेडनंतर सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत त्यांनी वकिली सुरू केली. भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक असून त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे.  'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. 

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेरश्मिका मंदानासेलिब्रिटी