तब्बल २० वर्षांनंतर रेखा देणार स्टेज परफॉर्मन्स; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 03:23 PM2018-06-13T15:23:57+5:302018-06-13T20:53:57+5:30
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी गेल्या २०वर्षांत कुठलाही स्टेज परफॉर्मन्स दिला नाही. पण आता रेखांनी आपला निर्णय बदलला आहे. ...
ॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी गेल्या २०वर्षांत कुठलाही स्टेज परफॉर्मन्स दिला नाही. पण आता रेखांनी आपला निर्णय बदलला आहे. होय, तब्बल २० वर्षांनंतर रेखा स्वत:च्या काही लोकप्रीय गाण्यांवर स्टेज परफॉर्मन्स देणार आहेत, तेही आयफा सोहळयात.
थायलंडची राजधानी बँकॉक येथे यंदाचा आयफा सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री मुंबईत वरूण धवन, आयुष्यमान खुराणा आणि रेखा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना रेखांनी हा खुलासा केला. दोन दशकांनंतर मी स्टेज परफार्मन्स देणार आहे. मी माझ्याच गाण्यांवर थिरकेल. पण ही गाणी कोणती असणार, ते त्याक्षणालाच कळेल,असे त्या म्हणाल्या.
यापूर्वी ३१ जानेवारी १९९८ रोजी रंगलेल्या ४३ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याच्या स्टेजवर रेखा परफॉर्म करताना दिसल्या होत्या. यावेळी त्या ‘ये क्या शहर है दोस्तो’,‘इन आंखो की मस्ती’, ‘सलाम ए इश्क’ आणि ‘दिल चीज क्या है’ या गाण्यांवर थिरकल्या होत्या.
उल्लेखनीय आहे की, आयफाच्या ब्रांड अॅम्बीसिडर पदावरून अमिताभ बच्चन यांना हटवण्यात आले आहे. अर्थात याची घोषणा २०१० मध्येच झाली होती. पण थेटपणे अमिताभ यांच्या जागी आयफाच्या ब्रांड अॅम्बीसीडरपदी दुस-या कुण्या व्यक्तिची नियुक्ती झाली नव्हती. अर्थात यंदा या पदासाठी सलमान खानचे नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयफा अवार्डमध्ये रेखा थिरकणार असल्याने त्यांच्या या निर्णयामाृगे अमिताभ बच्चन तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय,चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री रेखांवर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलिवूड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही.प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत.
ALSO READ : रेखा यांचा स्पेशल एपिसोड अन् अमिताभ बच्चन यांचे ट्विट ; याला योगायोग म्हणायचे की आणखी काही?