Join us

40 वर्षांची प्रतीक्षा संपली, अखेर नीना गुप्ता यांना ती संधी  मिळाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 14:29 IST

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या जाम खूश आहेत आणि कारण आहेत अमिताभ बच्चन.

ठळक मुद्दे‘गुडबाय’ या सिनेमात नीना अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या जाम खूश आहेत आणि कारण आहेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). होय, नीना गुप्ता इतक्या वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदा अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. एका ताज्या मुलाखतीत खुद्द नीना यांनी ही माहिती दिली.

‘गुडबाय’ हा सिनेमा माझा व अमिताभ यांचा पहिला सिनेमा आहे, हे जाणून लोक हैराण आहेत. पण हे सत्य आहे. 40 वर्षांच्या करिअरमध्ये मला पहिल्यांदा अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय, याचा मला आनंद आहे. किमान त्यांच्यासोबत काम करण्याची संधी तर मिळाली. आम्ही अनेक वर्षांपासून एका प्रोजेक्टवर चर्चा करत होतो. पण हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात पूर्ण झाला नाही, असे नीना यांनी या मुलाखतीत सांगितले. (Neena Gupta Film Goodbye)

‘गुडबाय’ या सिनेमात नीना अमिताभ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,‘ मी अनेक वर्षांपासून बच्चन कुटुंबाची फॅमिली फ्रेन्ड आहे. जयाजी मला दरवर्षी होणा-या दिवाली पार्टीसाठी बोलवतात.  मात्र अमिताभ यांच्यासोबत अभिनय करण्याची वेळ येते तेव्हा भीती वाटते. आधी याच विचाराने सुरुवातीला मी सेटवर खूप नर्वस होते.  त्यांच्या समोर अभिनय करताना एक दडपण होते. मात्र नंतर काही काळाने आम्ही सेटवर खूप गप्पा मारू लागलो. आता सर्व सामान्य आहे.’बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता  सध्या  त्यांच्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ प्रकाशित झालं.  या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे केले आहेत. 

टॅग्स :नीना गुप्ताअमिताभ बच्चन