Join us

Akshay Kumar: 'राम सेतू'च्या सेटवर कोरोनाचा उद्रेक! अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 10:45 AM

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या शुटिंग सुरू असलेल्या त्याच्या 'राम सेतू' चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या शुटिंग सुरू असलेल्या त्याच्या 'राम सेतू' (Ram Setu) चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रिकरण थांबविण्यात आलं आहे. (After Akshay Kumar 45 junior artists of Ram Setu test COVID 19 positive)

अभिनेता अक्षय कुमार यालाही आता पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 'राम सेतू' या चित्रपटाचं मुंबईतील मड आयलंड येथे चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठी जवळपास १०० ज्युनिअर आर्टिस्ट रविवारी सेटवर येणार होते. पण चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक केल्यानं प्रत्येकाची चाचणी घेण्यात आली आणि यात ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

बॉलिवूडला कोरोनाचा विळखाअक्षय कुमारसोबतच याआधी अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट, कार्तिक आर्यन, आमिर खान, रुपाली गांगुली यांनाही कोरोनानं गाठलं आहे. 

चित्रपटाचं शुटिंग पुढे ढकललंअक्षय कुमारसोबत 'राम सेतू'च्या ४५ ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. जवळपास १५ दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता. 

टॅग्स :अक्षय कुमारकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड