Actress Rekha Love Life: रेखा एकेकाळी सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या सौंदर्याची चर्चा आजही होते. सुंदरता, दमदार अभिनय आणि जबरदस्त डान्स यामुळे रेखा स्पेशल होती. ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. तिचं लव्ह लाइफ फारच वादग्रस्त होतं. अमिताभ बच्चन आणि तिच्या नात्याबाबत तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांच्यासोबत इतरही काही लोकांसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी अमिताभनंतर रेखा एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती. तो म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान.
हे नाव वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे सत्य आहे. अमिताभ बच्चनपासून दूर गेल्यानंतर रेखाच्या मनात इमरान खानने जागा मिळवली होती. इमरान खान सुद्धा रेखाच्या सुंदरतेवर फिदा झाला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. त्यांचे फोटो छापले जात होते आणि लग्न होणार असल्याचीही चर्चा होती.
केवळ रेखाच नाही तर तिच्या परिवारातील लोकांना आणि तिच्या आईलाही इमरान खान पसंत होता. त्यांचं लग्न व्हावं असं तिला वाटत होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसा, दोघांची पत्रिका जुळवण्यासाठी रेखा दिल्लीला आली होती. जवळपास लग्न फिक्स मानलं जात होतं. पण पुन्हा एकदा रेखाला नशीबाने दगा दिला. तिचं प्रेम पुन्हा अधुरं राहिलं.
जेव्हा रेखा हे लग्न करण्यासाठी तयार होती तेव्हा इमरान खान या लग्नासाठी तयार नव्हता. त्यावेळी एक मुलाखतीत इमरानने सांगितलं होतं की, अभिनेत्रीचा साथ थोड्या वेळासाठी ठीक आहे. जो एन्जॉय करून तो पुढे निघून जातो. पण अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा त्याचा काही विचार नाही. याच मुलाखतीतून हे स्पष्ट झालं होतं की, हे नातं तुटण्याचं कारण इमरान खान होता.