राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला बसला खूप मोठा फटका, चौकशीत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:59 PM2021-07-26T12:59:30+5:302021-07-26T12:59:59+5:30

राज कुंद्राच्या अटकेनंतर आता शिल्पाच्या अडचणीतही वाढ झाली आहे.

After the arrest of Raj Kundra, Shilpa Shetty was hit hard | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला बसला खूप मोठा फटका, चौकशीत केला खुलासा

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला बसला खूप मोठा फटका, चौकशीत केला खुलासा

googlenewsNext

पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्यानंतर आता शिल्पाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. तिला खूप मोठा फटका बसला आहे.

सोमवारी राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शुक्रवारी क्राइम ब्रँचने जुहू येथील राज आणि शिल्पाच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी शिल्पाची कसून चौकशी करण्यात आली. तिला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणातील अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी शिल्पाला रडू कोसळले होते. या प्रकणानंतर आपली प्रतिमा फारच खराब झाल्याचे शिल्पाने म्हटले. तसेच अनेक मोठ्या ब्रँड्सनी काढता पाय घेतला असल्याचही तिने यावेळी सांगितले.


त्यामुळे राजच्या अटकेनंतर बरेच मोठे ब्रँंड्स आता शिल्पाच्या हातून निसटले आहेत. याशिवाय ती सुपर डान्सर्स या शोची परीक्षक देखील आहे. पतीच्या अटकेनंतर तिने शूटिंगही रद्द केले आहे.


शिल्पाला वियान या त्यांच्या कंपनीबाबत बरेच प्रश्न विचारण्यात आले, याच कंपनीच्या ऑफिसमधून पॉर्न कंटेट अपलोड केल्या होत्या. दरम्यान शिल्पा देखील या कंपनीची भागीदार होती, पण २०२० मध्ये तिने या कंपनीतून बाहेर पडली होती. या संदर्भातही तिची चौकशी करण्यात आली.

वियान ही कंपनी शिल्पा आणि राज यांचा मुलगा वियान याच्या नावावरून ठेवण्यात आले होते. सध्या राज कुंद्राची पोलिस कोठडी वाढवली असून आणखी ११ लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.


राज कुंद्राच्या अटकेपासून शिल्पा शेट्टी सोशल मीडियापासून लांब आहे. मात्र गुरूवारी रात्री उशीरा तिने स्टोरीवर एक पोस्ट केली होती. ती हिमंत हारणार नाही अशा आशयाची ही पोस्ट होती.

Web Title: After the arrest of Raj Kundra, Shilpa Shetty was hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.