Join us

या कारणामुळे बालसुब्रमण्य यांनी सलमान खानसाठी गाणे गाणं केले होते बंद, तुम्हाला वाटेल आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 17:50 IST

जवळपास १७ चित्रपटात सलमानला आवाज दिल्यानंतर एस पी बालसुब्रमण्य यांनी सलमानसाठी गाणं बंद केलं.

ठळक मुद्देबालसुब्रमण्यम यांनी यामागील कारण कोणालाही सांगितलं नाही. तसेच त्यांना विचारण्याची कोणाची हिंमत देखील झाली नाही. परंतु सलमानने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.

एस पी बालसुब्रमण्य यांचा आवाज सलमान खानला अनेक चित्रपटांतील गाण्याला मिळाला. सलमानच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एस पी बालसुब्रमण्यम आणि सलमान हे एक समीकरणच बनले होते. सलमानच्या कारकिर्दीतील सुरुवातीचे चित्रपट प्रचंड हिट झाले. त्यात या चित्रपटाच्या गाण्यांचा देखील तेवढाच हात होता. त्यामुळे सलमानच्या यशात बालसुब्रमण्यम यांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

मैंने प्यार किया, लव्ह, हम आपके है कौन, साजन या चित्रपटातील गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. पण १९९५ नंतर  बालसुब्रमण्य यांनी सलमानसाठी गाणं गायचं अचानक बंद केलं. बालसुब्रमण्यम यांनी यामागील कारण कोणालाही सांगितलं नाही. तसेच त्यांना विचारण्याची कोणाची हिंमत देखील झाली नाही. परंतु सलमानने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.  जवळपास १७ चित्रपटात सलमानला आवाज दिल्यानंतर त्यांनी सलमानसाठी गाणं बंद केलं. मैंने प्यार किया पासून अंदाज अपना अपना या चित्रपटापर्यंत त्यांचा आवाज सलमानला लाभला. 

सलमानने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, बालसुब्रमण्यम यांचा आवाज माझ्यावर सूट करत होता यात काहीच शंका नाही. त्यांच्या आवाजात जादू आहे. त्यांची सगळीच गाणी हिट ठरतात. पण वयोमानानुसार त्यांचा आवाज बदलला. त्यामुळे त्यांचा आवाज मला सूट करत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी गाणं गाणे बंद केले.

सलमानच्या या मुलाखतीनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

 

 

टॅग्स :सलमान खान