रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणारी राणू मंडल आपल्या सुरेल आवाजानं देशभरात लोकप्रिय झाली आहे. आता तिला सगळे स्टार म्हणून ओळखतात. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतर आता राणूने पहिल्यांदाच स्टेज परफॉर्मन्स केला आहे आणि आता ती भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करू शकते, असं बोललं जातंय.
मीडिया रिपोर्टनुसार राणू मंडलला भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत गाणे गाण्याची ऑफर मिळाली आहे. अभिनेता प्रदीप पांडे चिंटूने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या चित्रपटातील गाणं राणू मंडलकडून ध्वनीमुद्रीत करून घ्यायचं आहे.
प्रदीपने पुढे सांगितलं की, आपल्या देशातील एक चांगली गायिका समोर आली आहे. ती म्हणजे राणू मंडल जी. त्यांनी लोकांच्या मनात ज्या गतीनं स्थान मिळवलं आहे ते खूप कमालीचं आहे. राणू भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकांच्या मनातही स्थान निर्माण करत आहे. मी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांचा चाहता झालो. मीच नाही तर संपूर्ण भोजपुरी इंडस्ट्री राणू मंडल यांचं स्वागत करेल.
रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत. काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला.
रानू लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.