Join us

आदिनाथ कोठारेला लागली लॉटरी; '83' नंतर पुन्हा झळकणार एका बॉलिवूडपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:35 IST

Aadinath kothare: कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट गाजल्यानंतर आदिनाथ लवकरच रोहन सिप्पी यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणजे आदिनाथ कोठारे. मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या डंका वाजवल्यानंतर आदिनाथने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या '83' या चित्रपटात आदिनाथ झळकला असून या चित्रपटातील त्याच्या कामाची सर्व स्तरांमध्ये प्रशंसा करण्यात आली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर त्याच्या पदरात आणखी एक बॉलिवूड चित्रपट पडला आहे. 

कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट गाजल्यानंतर आदिनाथ लवकरच रोहन सिप्पी यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा रोहन सिप्पी यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा पोटो पाहिल्यावर आदिनाथच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागली आहे. 

"होय, मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलिवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा भाग होणं, नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट रसिकांच्या भेटीला येईल,” असं आदिनाथ म्हणाला.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, “आदिनाथ स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने स्वत:साठीच्या भूमिका निवडतांना तो खूप चोखंदळ आणि सजग असतो. त्यामुळेच बॉलिवूडमधून सातत्याने ऑफर्स येत असतांनाही त्याने बॉलिवूड डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे, त्या  नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे. अशावेळेस रोहन सिप्पींसोबत त्याने आपले नवे प्रोजेक्ट करणेही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणायला हवी.” 

टॅग्स :आदिनाथ कोठारेसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा