Join us  

हार्दिक पंड्यासोबत विभक्त झाल्यानंतर जवळच्या मित्रासोबत स्पॉट झाली नताशा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:14 PM

Natasha Stankovic And Hardik Pandya : नताशा स्टॅन्कोविक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशाने वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते.

नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि नताशाने वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. घटस्फोटाबद्दल जाहीर करण्याआधी ती मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती. त्यानंतर आता नताशा मुंबईला परतली आहे. भारतात येऊन तिला फक्त एक आठवडा झाला आहे आणि नुकतीच ती तिचा जवळचा मित्र अलेक्झांडरसोबत स्पॉट झाली. हे दोघेही मुंबईत फिरताना पापाराझींनी स्पॉट केले होते. ते एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

नताशा आणि हार्दिक यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाही अलेक्झांडर तिच्यासोबत दिसला होता. मग पापाराझीने तिला घटस्फोटाबद्दल विचारले असता तिने तिचे आभार मानले आणि पुढे निघून गेली. त्यानंतर नेटकऱ्यांनी अलेक्झांडरवर बरीच टीका केली आणि नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटासाठी त्याला जबाबदार मानले. अलेक्झांडर बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत आहेत की तो दिशा पटानीचा बॉयफ्रेंड आहे.

नताशा हार्दिकसोबत करतेय मुलाचे संगोपनव्हिडिओमध्ये नताशा पांढऱ्या शर्ट आणि काळ्या पँटमध्ये सुंदर दिसत आहे, तर अलेक्झांडरने निळ्या रंगाचा कॅज्युअल टी-शर्ट आणि काळी शॉर्ट्स घातली आहे. त्याने जवळ उपस्थित असलेल्या पापाराझींना हात दाखवून अभिवादन केले. नताशा आणि हार्दिकने १८ जुलै, २०२४ रोजी घटस्फोटाची माहिती दिली होती. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय कठीण असल्याचे सांगितले होते आणि ते दोघे मिळून त्यांचा 4 वर्षांचा मुलगा अगस्त्याला वाढवणार असल्याचेही सांगितले होते.

हार्दिक पंड्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत चर्चेतआता हार्दिकबद्दल चर्चा आहे की तो ब्रिटीश गायिका जॅस्मिन वालियाला डेट करत आहे. दोघांनी एकत्र व्हॅकेशन एन्जॉय केले. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या  ट्रीपचे फक्त एकच फोटो पोस्ट केले. त्यानंतर नेटिझन्सना त्यांच्या फोटोंची पार्श्वभूमी सारखीच असल्याचे आढळले, त्यामुळे ते एकत्र सुट्टीवर गेले होते अशी चर्चा सुरू झाली. नताशा आणि हार्दिकने २०२० मध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली होती.

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या