बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती अभिनेत्री तिच्या आगामी 'खो गये हम कहाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. अनन्या तिच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. आदित्य रॉय कपूरसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.
अनन्या पांडेने 'कॉफी विथ करण 8' मध्ये तिच्या आणि आदित्याच्या नात्याबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते, तर आदित्यने देखील करणला शोमध्ये येताच सांगितले की, त्याला असा कोणताही प्रश्न विचारू नको, ज्यामुळे त्याला खोटे बोलावे लागेल.
नुकतीच अनन्या आज तकच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. जिथे तिला विचारण्यात आले की ती ब्रेकअपला कशी सामोरी गेली? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, “मी रडते. मी स्वतःला खोलीत बंद करून आईस्क्रीम खाते. मला एकटे राहायला आवडते.” ब्रेकअपवर मात करण्याचे मार्गही अभिनेत्रीने सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, "एखाद्याने खूप लवकर पुढे जाऊ नये... हळू चालत जा आणि आईस्क्रीम खा."
अनन्या पांडे सध्या आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. नुकताच या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यात अनन्या आदित्यचा हात पकडून दिसत होती. अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसली होती. लवकरच ती 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसणार आहे.