Join us

'ब्रेकअप के बाद' नेहा कक्कर सांगतेय सिंगल असण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:03 IST

नेहा कक्कर काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आहे. यानंतर अनेक वेळा नेहा भावूक झालेली दिसली.

ठळक मुद्देनेहाने ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमधून जात असल्याचे सांगितले होतेनेहाला या ब्रेकअपमधून बाहेर पडायला खूप वेळ लागला

नेहा कक्कर काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आहे. यानंतर अनेक वेळा नेहा भावूक झालेली दिसली. मात्र नुकतेच नेहा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिंगल होण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. नेहाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''सिंगल होण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही वेळेवर झोपू शकता.''   

नेहाने ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमधून जात असल्याचे सांगितले होते, मी डिप्रेशनमध्ये आहे. याबद्दल जगातील सगळ्या निगेटीव्ह लोकांचे आभार. मला आयुष्यातील सगळ्यांत वाईट दिवसांचा अनुभव देण्यात तुम्ही यशस्वी झाला. तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन...असे नेहाने लिहिले होते. माझ्यावर प्रेम करणाºयांची मी आभारी आहे. पण जे लोक मी कुठल्या परिस्थितीतून जातेय, याची पर्वा न करता माझ्याविषयी वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांना मी विनंती करते, प्लीज हे सगळे थांबवा, मला माझे आयुष्य जगू द्या...असेही नेहाने म्हटले होते..

 नेहाला या ब्रेकअपमधून बाहेर पडायला खूप वेळ लागला. अनेक लाईव्ह शो दरम्यान नेहा चक्क रडू लागली होती.  नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते.

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली