टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एकेकाळी सुशांत सिंग राजपूत व अंकिता लोखंडे लोकप्रिय कपल होते. लग्न करण्याच्या तयारीत असताना ते दोघे वेगळे झाले. अंकिताने सुशांतसोबत भविष्यातील स्वप्ने पाहिली होती. पण सुशांत अचानक सोडून गेल्यामुळे ती कोलमडून गेली. ती जगासमोर जरी सशक्त महिला म्हणून समोर आली असली तरी तिला एकटेपणा आतून पोखरत होते. अशा काळात तिची छोटी बहिण ज्योती लोखंडे (अशिता)ने अंकिताला जगण्याचा खरा अर्थ समजवला.
सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जगासमोर अंकिता खूश असल्याचे दाखवत होती. पण तिची छोटी बहिण ज्योतीला तिचे एकटेपण समजले होते. काही काळ ज्योती स्वतःला विसरून अंकितासोबत तिच्या सावलीसारखी उभी राहिली होती. कारण तिला एकटेपणा वाटू नये.
हळूहळू अंकिताला या गोष्टीची जाणीव झाली की जीवनात मित्रमंडळी किती महत्त्वाचे असतात. या गोष्टीचा खुलासा तिने इंस्टाग्राम पोस्टवर केला होता.
ज्योती नेहमी अंकिताकडे लक्ष द्यायची. तिचा मूड चिअर अप करण्यासाठी पार्टीला जायची.
भावा बहिणींसोबत राहून हळूहळू अंकिता ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडली.