Join us

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्या ग्रीन एकर्स सोसायटीने घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 11:48 AM

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी होळी न सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या सोसायटीमध्ये श्रीदेवी रहायच्या त्या ग्रीन ...

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी होळी न सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या सोसायटीमध्ये श्रीदेवी रहायच्या त्या ग्रीन एकर्स सोसायटीने या वर्षी होळी न सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे सोसायटीने एक पत्रक जारी केले आहे. या पत्रात से लिहले आहे की, " श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी  २ मार्चला होणारे  होळीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ह्यावेळेस सोसायटीमध्ये यावर्षी रंग खेळला जाणार नाही.याआधी शबाना आझमी यांनी देखील त्यांच्या घरी दरवर्षी होणारी होळीची पार्टी रद्द केली आहे.  श्रीदेवी आणि शबाना आझामी  गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचमुळे आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या निधनानंतर शबाना यांनी आपल्या घरातील यंदाची होळी पार्टी रद्द केली आहे. आज श्रीदेवी यांचे पार्थिव पाहुन  विद्या बालन भावूक झाली. ही श्रीदेवी यांची खूप मोठी फॅन आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तुम्हारी सुलू या चित्रपटात श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटातील हवाहवाई या गाण्यावर विद्या थिरकली होती. विद्या आपल्या या लाडक्या नायिकेला या अवस्थेत पाहूच शकत नव्हती. ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडत होती. बोनी कपूर यांना भेटल्यानंतर तर विद्याला तिचे अश्रू अनावर झाले. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर तिला सावरत होते. तिची ही अवस्था पाहून सोनम कपूरने विद्याला जवळ घेतले.  श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ALSO READ :  दु:खात वडिलांचा आधार बनला अर्जुन कपूर; पाहा श्रीदेवी यांच्या अंतिम प्रवासाचे फोटो!श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.