''चिट्टीयां कल्लाईयाँ'' वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की जॅकलिन कधी काळी डिप्रेशनमध्ये गेली होती. फिल्मी बिटच्या रिपोर्टनुसार जॅकलिनने मीडियाशी बोलताना याचा उलगडा केला होता. जॅकलिनने सांगितले थेरपीच्या मदतीने तिने तणावावर मात केला. दीर्घकाळ आयुष्यात एकटं राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. दीपिका पादुकोण ते बिपाशापर्यंत अनेक अभिनेत्री डिप्रेशनचा बळी झाल्या होत्या. या यादीत आता जॅकलिनचे नावदेखील सामील झाले आहे.
जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश आणि अरेबिक भाषादेखील येते. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी 'बच्चन पांडे' हा एक चित्रपट आहे.
रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. तसेच सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरसोबत 'भूत पुलिस', तर सलमान खानसोबत 'किक-२'मध्येही स्क्रीन शेअर करणार आहे.