सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली. तिला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यासाठी ती अमेरिकेला गेली होती. जवळपास वर्षभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती कर्करोगमुक्त झाली आणि काही महिन्यांपूर्वीच ती भारतात परतली आहे. या ट्रीटमेंट दरम्यान तिला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला.तरीदेखील ती नेहमीच सकारात्मक राहिली आणि आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी शेअर करत होती. सध्या सोनाली मुंबईमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करत असून ती आता आणखी एक ट्रीटमेंट घेत असल्याचे तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून समोर आले आहे.
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती अॅक्वा थेरेपी घेताना दिसत आहे. सोनाली पाण्यामध्ये व्यायाम करत आहे.
सोनाली सांगते, सामान्य परिस्थितीत असा व्यायाम करण सोपे आहे. पण पाण्याच्या आत राहून असा व्यायाम करणे खूप कठीण असते. हा व्हिडिओ शेअर करताना सोनालीने सर्वांना एक सुचनादेखील केली आहे. तिने लिहिले की, सूचना: हे जेवढे पाहताना सोपे वाटत आहे. तेवढे सोपं ते अजिबात नाही. माझ्या नव्या अॅक्वा थेरेपीचे ट्रेनिंग सेशन खूप कठीण आहे. पण हेच जर मी पाण्याच्या बाहेर करेन तर खूप सोपे आहे. पण यातून मला समाधान मिळावे असा माझा सामान्य प्रयत्न आहे आणि मला यापासून लांब पळण्याचा कोणतेही कारण शोधायचे नाही.
सोनाची उपचारादरम्यान कीमो थेरेपीच्या वेळी केस काढावे लागले होते. पण आता नव्याने सोनाली डोक्यावर केस यायला सुरूवात झाली आहे. या अनुभवाबद्दल सोनाली म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांदा हेअरकट केला तेव्हा मला अजिबात दुःख झाले नाही. त्यावेळी केसांपेक्षा आपले जिवंत असणे महत्वाचे आहे याची मला जाणीव झाली. अशा प्रकारे माझ्या विचारांमध्ये बदल होत गेला. मला आतापर्यंत माझ्या केसांमुळे खूप कंटाळवाणे वाटत असे. माझे केस लांबसडक होते. त्यामुळे तुमचे केस जेव्हा लांबसडक असतात तेव्हा तुम्हाला ते कापायची खूप भीती वाटत राहते.