सैफ अली खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सैफ अली खानने गेल्या काही वर्षात 'आदिपुरुष', 'देवरा', 'विक्रम वेधा' अशा सिनेमांमधून अभिनयाची चुणुक दाखवली आहे. सैफचा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेला ज्यु. एनटीआरसोबतच्या 'देवरा' सिनेमाचं खूप कौतुक झालंं. अशातच सैफला आणखी एका साऊथच्या रिमेकमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. हा सिनेमा साऊथ सुपरस्टार नानीच्या सुपरहिट सिनेमाचा रिमेक आहे.
या सिनेमात झळकणार सैफ अली खान
गेल्या काही महिन्यांपासून सैफ अली खान सुपरहिट सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या 'देवरा' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सैफ अली खान आगामी कोणत्या सिनेमात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर याबद्दल खुलासा झाला असून साऊथ सुपरस्टार नानीच्या सिनेमाच्या हिंदी रिेमेकमध्ये झळकणार आहे. 'गँग लीडर' असं या सिनेमाचं नाव असून त्याच्या हिंदी रिमेकमध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिका साकारणार आहे.
२०२५ ला सैफचे येणार हे सिनेमे
२०२५ ला सैफ अली खानचे अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यातील सैफचा महत्वाचा सिनेमा म्हणजे 'रेस 4'. काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या रेस सिनेमाच्या तिसऱ्या भागात सैफ अली खान दिसला नव्हता. 'रेस 3' बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला. त्यामुळे आता 'रेस 4' मध्ये पुन्हा एकदा सैफ अली खान परतला असून रमेश तौरानी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे सैफच्या चाहत्यांसाठी पुढील वर्ष खास असेल यात शंका नाही.