Join us

चाललंय तरी काय? घटस्फोटाच्या अवघ्या काही दिवसांतच आमिर -किरण पुन्हा एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:36 AM

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमिर खान आणि किरण राव  या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते.  या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले होते. इतकेच काय तर आमिर आणि किरण दोघांनी लाईव्ह येत चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देत दोघेही त्यांच्या निर्णयाने खुश असल्याचे सांगितले होते.

 

 

घटस्फोट झाला असला तरी आम्ही एकत्रच आहोत. घटस्फोट म्हणजे आमच्या नात्याची नवीन सुरुवात आहे. नात्यात बदल आला असला तरी आम्ही एकच कुटुंब आहोत. पाणी फाऊंडेशन हे देखील आमचे मुल आझादप्रमाणेच आहे.तुम्ही सर्वांनी आमच्या आनंदासाठी प्रार्थना करा असे सांगत आमिरने चाहत्यांना सांगितले होते. 

आता पुन्हा आमिर आणि किरण या दोघांचा एका फोटोने चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत. सिनेमाचा आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो आहे. हा फोटो अभिनेता नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा चैतन्य अक्किनेनी  शेअर केला आहे. चैतन्य हा  आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

 

विशेष म्हणजे या फोटोत आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसतात. आमिर आणि किरण या दोघांच्या मैत्रीवर त्यांच्या घटस्फोटोचा काहीही फरक पडला नसल्याचे यातून स्पष्ट होते. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात. 

टॅग्स :आमिर खानकिरण राव