Join us

पतीची पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आता राखी सावंतने शेअर केला बेडरुममधला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 08:52 IST

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिचा पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि मारहाण सारखे अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली आहे. राखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने आदिलसोबतचा बेडरूमचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आदिलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. हे शेअर करत राखीने कॅप्शनमध्ये तुटलेले हार्ट असलेले अनेक इमोजी शेअर केली आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्री खूप भावूक झाली आहे आणि कमेंटमध्ये तिला सर्व काही ठीक होईल असे सांगत आहेत. तर काही जण तिला ट्रोल करताना दिसले. एका युजरने लिहिले की, 'मी अनफॉलो करत आहे कारण मला तुझे नाटक बघून कंटाळा आला आहे'. याशिवाय आणखी एकाने लिहिले की, 'या व्हिडिओचा आता काय अर्थ आहे'.

नुकताच राखीने आदिलशी संबंधित आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वास्तविक इन्स्टंट बॉलिवूडने सोमवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राखी असे म्हणताना दिसते आहे की, 'अलिकडेच एका इराणी विद्यार्थिंनीने म्हैसूरमध्ये आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे आदिल खानची गर्लफ्रेंड तनु चंडेल प्रेग्नंट असून ती आई होणार आहे. हे सर्व माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. आदिल, तू माझ्यासोबत बाळाचा प्लान केला होतास, मी तुझी बायको आहे आणि तू तुझ्या मैत्रिणींसोबत बाळाचे प्लानिंग करत आहेस.'
टॅग्स :राखी सावंत