बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी पत्नी सुनिता यांच्यासमवेत शनिवारी हिमाचल प्रदेशमधील शक्तिपीठ माँ ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. देवी माताचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विधिवत पूजा आणि आरतीही केली. येथील पुजाऱ्याने मंत्रोच्चार आणि वैदीक मंत्र उच्चारांसह पूजा केली. यावेळी, गोविंदांच्या चाहत्यांनीही मंदिरात गर्दी केल्याचं दिसून आला. अभिनेत्याने चाहत्यांसमवेत फोटोही काढला. गोविंदा दरवर्षी माँ ज्वालामुखीच्या दर्शनासाठी येत असतात.
गोविंदा यांची पत्नी सुनिता माँ ज्वालामुखीची भक्त असून दोघेही दरवर्षी मंदिरात दर्शनासाटी न चुकता येतात. मात्र, यंदा गोविंदा व सुनिता यांनी मनोकामना पूर्ती झाल्याने देवी माताच्या मंदिरात माथा टेकला. गोविंदाच्या कुटुंबीयांची मंदिरात मोठी आस्था असून आपण माँ ज्वालामुखीकडे मनोकामना व्यक्ते केली होती, ती पूर्ण झाल्याचं गोविंदाने सांगितले.
माँ ज्वालामुखीच्या आशीर्वादाने आमची मनोकामना पूर्ण झाली. म्हणून आम्ही पती-पत्नी देवी माताच्या मंदिरात माथा टेकण्यासाठी आलो, असे गोविंदाने सांगितले. यावेळी, गोविंदाचे मंदिर प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच, देवी माताची चुनरी आणि सिरोपा हेही त्यांना भेट देण्यात आलं.