सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या 'गदर २' (Gadar 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांनंतर त्याचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. गदर २च्या कमाईने बॉक्स ऑफिसवरही विक्रम केले आहेत. सनी देओल हा केवळ एक उत्तम अभिनेता नाही. तर त्याने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे. पण सनी देओलला निर्माता म्हणून यश मिळवता आले नाही, जे त्याने कलाकार म्हणून केले आहे. दुसरीकडे, गदर २ च्या यशादरम्यान, सनी देओलने निर्माता म्हणून स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे.
सनी देओलने अलीकडेच बीबीसी एशिया नेटवर्कला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी गदर २ चित्रपटाच्या यशाबद्दल आणि निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीबद्दल खूप काही सांगितले. सनीने सांगितले की, तो जेव्हाही चित्रपट करतो तेव्हा तो दिवाळखोर होतो. तो म्हणाला, 'मनोरंजन जग खूप अडचणीतून जात आहे. सुरुवातीच्या वर्षांत, वितरण सामान्य असल्यामुळे मी गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकलो. तेच लोक होते ज्यांच्याशी आम्ही बोलायचो. कनेक्शन होते. कॉर्पोरेट्स आल्यापासून काही नाही. एवढा वेळ थांबणे एखाद्याला अवघड असते. तुम्हाला तुमचा जनसंपर्क करावा लागेल, धावपळ करावी लागेल आणि ते तुम्हाला चित्रपटगृहांची संख्या देणार नाहीत. त्यांना तिथे कोणीही असावे असे वाटत नाही. गेल्या दशकात मला माझ्या चित्रपटांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुम्ही विशिष्ट प्रकारचा सिनेमा करण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला पाठिंबा मिळत नाही.
कलाकार म्हणून जास्त आनंदी
सनी देओलने एक कलाकार म्हणून जास्त आनंदी असल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, 'मी निर्माता, दिग्दर्शक झालो, अनेक भूमिका साकारल्या. माणूस फक्त एकच गोष्ट करू शकतो. म्हणून मला वाटलं सगळं सोडून द्यावे, फक्त अभिनेता व्हावे. तर आता मला हेच करायचे आहे. एक अभिनेता म्हणून मी जमेल तेवढे चित्रपट करत आहे. गदर २ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.