ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या फॅन्ससाठीही जणू एक कोडं बनली आहे. बॉयफ्रेन्ड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावा राखीने केला आहे. पण या कहाणीत ट्विस्ट आहे. ट्विस्ट हा की, आदिलने लग्नाचा इन्कार केला आहे. साहजिकच यामुळे राखी दु:खी आहे. काल पापाराझींसमोर ती ढसाढसा रडताना दिसली. आदिलने आपल्याला धोका दिल्याचा आरोपही तिने केला. माझ्यासोबतच हे का, माझ्याच आयुष्यात इतकी दु:ख का, असं म्हणत राखी ढसाढसा रडली. पण आता राखीच्या नव्या व्हिडीओनं चाहतेही कन्फ्युज झाले आहेत. काल ढसाढसा रडणाऱ्या राखीने आज आदिलसोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी व आदिल रोमॅन्टिक होताना दिसत आहेत. एकमेकांना किस करत आहेत. राखीचा हा व्हिडीओ बघून चाहते संभ्रमात आहेत. नेमकं हे काय चालू आहे, हेच चाहत्यांना कळायला मार्ग नाही..
भडकले लोकराखीचा हा व्हिडीओ समोर येताच अनेक सोशल मीडिया युजर्स भडकले आहेत. कधी हसतेय, कधी रडतेय, नेमकं काय झालं कळतंच नाहीये, असं एका युजरने लिहिलं आहे. काय फालतु ड्रामा लावला आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचं एका युजरने म्हटलं आहे.
राखीने अलीकडे लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो अलीकडे व्हायरल झाले होते. यानंतर राखीने स्वत: लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केलेत. ७ महिन्यांपूर्वीच मी आदिल खान दुर्राणीशी लग्न केलं होतं. जुलै २०२२ मध्ये आम्ही कोर्ट मॅरेज आणि निकाह केला होता, असा दावा राखीने केला होता. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने धर्म परिवर्तन केलं. राखीने तिचं नाव बदलून ‘फातिमा’ असं ठेवलं. मात्र आदिलने हे मानण्यास साफ नकार दिला.