नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशामध्ये दुरावा आल्याचे बोलले जात होते. मात्र अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले. दरम्यान आता नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा मुलगा अगस्त्यसोबतच्या आउटिंगचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
नताशाचे हे फोटो तिने आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी समोर आले आहेत. हे फोटो शेअर करताना नताशाने असेही लिहिले की, तिचे 'हृदय आनंदाने भरले आहे'. नताशा गेल्या आठवड्यात मुंबईहून सर्बियाला तिच्या घरी रवाना झाली होती. त्यानंतरच तिने आणि हार्दिकने घटस्फोटाची घोषणा केली.
मुलगा अगस्त्यसोबत नताशा करतेय टाइम स्पेंडनताशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर डायनासोर थीम पार्कमधील तिचे आणि तिच्या मुलाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने अगस्त्यसोबत पोस्ट केलेल्या सेल्फीमध्ये तिने व्हाइट हार्ट इमोजीसह 'हार्ट फुल ऑफ हॅप्पी' असे लिहिले आहे. नताशा आणि हार्दिक त्यांचा मुलगा अगस्त्यचे पालन एकत्र करणार आहेत. ते म्हणाले होते की, "आम्हाला अगस्त्यच्या रूपाने आशीर्वाद मिळाला आहे जो आमच्या दोघांच्याही जीवनाच्या केंद्रस्थानी असेल आणि आम्ही त्याला प्रत्येक गोष्ट मिळेल, याची काळजी घेऊ. आनंद आणि प्रेम. आम्ही त्याला एकत्र वाढवू. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला प्रायव्हसी देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनाची मनापासून विनंती करतो."
नताशा आणि अगस्त्य थीम पार्कमध्ये दिसले फिरतानानताशा आणि हार्दिकने २०२० मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले. त्यांनी २०२३ मध्ये त्यांच्या लग्नाचे नूतनीकरण केले. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत होत्या, अखेर त्यांनी एका इन्स्टा पोस्टद्वारे या बातमीला दुजोरा दिला.