Join us

'त्या' दिवशी गुगल सर्चमध्ये इतक्या लाख लोकानी सुशांतला केले सर्च तर, इन्स्टावर त्याच्याविषयी भरभरून लिहीणा-यांची आहे मोठी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:49 AM

21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता.

सुशांत आत्महत्या केली त्यादिवशी सर्वत्रच शोकाकुल वातारवण पाहायाला मिळाले. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल असे काही ऐकून चाहत्यांना जबर धक्काच बसला. सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे? अशा सगळ्या प्रश्नांनी अनेकांच्या मनात काहुर माजला होता. सोशल मीडियावर वेगेवगेळी सुशांतबाबत माहिती व्हायरल होत होती. त्याच्याविषयी आणखी काही समजंय का? या उद्देशाने अनेकांनी त्याला सर्च केले. सुशांतच्या निधनाची बातमी आली त्यादिवशी 10 लाख लोकांनी सुशांतला गुगलवर सर्च केले तर इंस्टाग्रामवर 11 लाख लोकांनी त्याच्याविषयी भरभरून लिहिले तर दोन लाख लोकांनी ट्विट केले. यात बॉलिवूड सेलिब्रेटींचाही समावेश आहे. सुशांत काही दिवसांपासून नैराश्यावर उपचार करत होता. 

21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. शिक्षणात खूप हुशार होता. 11 वीत फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये गेला होता. तेथे त्याला सुवर्णपदक मिळाले होते. त्याची एक बहीण मितु सिंह राज्यस्तरीय पातळीची क्रिकेटरदेखील होती. तो आपल्या आईच्या खूप जवळचा होता.

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात बॅकअप डांसर म्हणून केली होती. त्यानंतर सुशांतने सर्वात आधी 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेतून अभिनय सुरू केला, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'काय पो छे'मधून केली होती. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमांस' आणि भारतीय क्रिकट कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक 'एम एस धोनी' मध्ये काम केले, त्यानंतर आमिर खानसोबत 'पीके' चित्रपट आणि 'छिछोरे' चित्रपटातही काम काम केले होते. विशेष म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत