बहुचर्चित ‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते. टीझरपासूनच ‘गदर २’ चर्चेत होता. अखेर ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
‘गदर २’च्या यशानंतर ‘गदर ३’ सिनेमा येणार असल्याची चर्चा आहे. ‘गदर २’ चित्रपटाच्या शेवटी “to be continue...”(पुढे सुरू राहील) असं स्क्रीनवर दिसत असल्याने या सिनेमा तिसरा भागाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. यावर गदर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एएनआयशी बोलताना भाष्य केलं. ते म्हणाले, “यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. सबर का फल मीठा होता है. मी आणि चित्रपटाचे लेखक काही गोष्टींचा विचार करत आहोत. सगळं घडताना पाहायला मिळेल, फक्त थोडी वाट पाहावी लागेल.”
“तुम्ही गेल्यानंतर तीन दिवस...”, वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेने शेअर केली भावुक पोस्ट
‘गदर ३’च्या चर्चांबरोबरच सनी देओलने यमला पगला दिवाना आणि अपने या चित्रपटांच्या सीक्वेलवरही भाष्य केलं. “सगळेच या चित्रपटांसाठी आतुर आहेत, हे मला माहीत आहे. आमचं संपूर्ण कुटुंब यमला पगला दीवाना चित्रपटात एकत्र दिसलं. प्रेक्षकांनाही ते खूप एन्जॉय केलं. सगळेच या चित्रपटांच्या सीक्वेलच्या प्रतीक्षेत आहेत. पण, त्यासाठी चांगल्या कथेची आवश्यकता आहे. सध्या माझ्याकडे अशी कोणतीही कथा नाही. अपने २साठी माझ्याकडे कथा आहे. बघुया पुढे काय होतंय,” असं सनी देओल म्हणाला.
Independence Day 2023: “तेरी मिट्टी में मिल जावा...”, अमृता फडणवीसांनी गायलेलं गाणं ऐकलंत का?
दरम्यान ‘गदर २’मध्ये सनी देओलबरोबर अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. अभिनेता उत्कर्ष शर्माने या चित्रपटात तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘गदर २’ने १७३ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.