Join us

हैदराबादनंतर महाराष्ट्रातल्या या शहारात उभ राहतोय राजमौली यांच्या सिनेमाचा सेट, आलिया करणार शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 2:22 PM

दिग्दर्शक एस. एस. राजमौली हे साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे.‘बाहुबली’ सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली आहे.

ठळक मुद्दे ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेबॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट साऊथमध्ये डेब्यू करतेय

दिग्दर्शक एस. एस. राजमौली हे साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे.‘बाहुबली’ सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी सिनेमा आरआरआरची घोषणा केली आणि त्यांच्या फॅन्सना या सिनेमाची उत्सुकता लागली. या सिनेमात तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट साऊथमध्ये डेब्यू करतेय. यात अजय देवगण ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

राजमौली यांनी नुकतंच आरआरआरचे हैदराबादमध्ये शूटिंगचे पहिले शेड्यूल संपवले आहे. दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग  पुण्यात होणार आहे. आरआरआरसाठी पुण्यात भव्य सेट उभारला जातो आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आलिया भटसह सिनेमाची टीम पुण्यात शूट करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ज्युनिअर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट यांच्यातील नवी केमिस्ट्री पाहता येणार आहे. आलिया यात सीतेची भूमिका साकारते आहे. ब्रिटिश अभिनेत्री डेजी एडगर जोन्स या सिनेमातून सिनेमसृष्टीत डेब्यू करतेय. डेजीला ज्युनिअर एनटीआरच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे.

राजमौली यांनी या चित्रपटासाठीच्या तयारीसाठी एनटीआर आणि राम चरण तेजा यांना अमेरिकेत पाठवले होते. रामचरण तेजा हा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. तर एनटीआर ज्युनिअर साऊथचे महानायक एनटीआर यांचे चिरंजीव आहेत.  आरआरआर  सिनेमा भारतातल्या जवळपास दहा भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. 30 जुलै 2020 आरआरआर रिलीज होणार आहे.  

 

टॅग्स :एस.एस. राजमौलीआलिया भटअजय देवगण