Join us

Anupam Kher: "यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते", सैनिकांचा अपमान करणाऱ्या रिचावर अनुपम खेर खवळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 3:32 PM

अभिनेत्री रिचा चढ्ढाने भारतीय सैनिकांविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे.

मुंबई : अभिनेत्री रिचा चढ्ढाने भारतीय सैनिकांविषयी केलेल्या एका ट्विटवरुन गदारोळ झाला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून येत आहे. अशातच आता बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक ट्विट करून रिचाला चांगलेच सुनावले आहे. देशाचे वाईट करून लोकप्रिय होणे हे लहान लोकांचे काम आहे अशा शब्दांत खेर यांनी रिचाचा समाचार घेतला. 

अनुपम खेर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "देशाबद्दल वाईट बोलून काही लोकांमध्ये लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करणे हे भ्याड आणि लहान लोकांचे काम आहे. आणि सैन्याची इज्जत पणाला लावणे… यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते." काही लोकांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीही बोलणे हे लहान लोकांचे काम असल्याचे खेर यांनी म्हटले आहे. 

काय होतं रिचाचं ट्विट? भारतीय सेनेचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. लेफ्टिनंट जनरल म्हणाले, "जर सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." यावर रिच्चाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केले, "Galwan says hi", अर्थात गलवान हाय म्हणत आहे. खरं तर याप्रकरणी भाजप नेते मंजिंदर सिंह यांनी रिचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई पोलिसांना केली आहे. रिचाचे विचार हे भारतविरोधी आहेत. ती राहुल गांधींची समर्थक आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

1 मे 2020 रोजी गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झटापट झाली होती. यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. चीनचे 35 ते 40 सैनिक मारले गेले. हा आकडा चीनने लपवलाही होता. यानंतर आजतागायत भारत आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :बॉलिवूडभारतीय जवानरिचा चड्डाअनुपम खेर