जॉन अब्राहमला डच्चू दिल्यानंतर सलमान खानने साइन केला 'रेस ३' आणि मागितले ७०% प्रॉफिट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 9:04 AM
ट्यूबलाईट चित्रपटाच्या अपयशानंतर सलमान खानच्या इमेज वर चांगलाच फरक पडला आहे. इतका की सलमान ला ट्यूबलाईट फ्लॉप झाल्यामुळें डिस्टीबुटर्स ...
ट्यूबलाईट चित्रपटाच्या अपयशानंतर सलमान खानच्या इमेज वर चांगलाच फरक पडला आहे. इतका की सलमान ला ट्यूबलाईट फ्लॉप झाल्यामुळें डिस्टीबुटर्स ला पैसे परत करावे लागले, त्याचीच भरपाई म्हणून की काय सलमानने 'रेस३'च्या प्रॉफिटमध्ये ७०% शेर मागितला आहे.बॉक्स ऑफिसचा सुल्तान समजल्या जाणाऱ्या सलमानला ट्यूबलाईटच्या अपयशाचा चांगलाच धक्का बसला आहे. त्याने या चित्रपटामुळे डिस्टीबुटर्सचे झालेल्याची नुकसान भरपाई सुद्धा केली. आता सलमान त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. त्यात 'रेस ३' चित्रपटाचा देखील समावेश आहे. यातील प्रोफ्टिचा ७०% भाग सलमानने मागितला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डीसुझा करणार असून सलमान या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. तर जॅकलीन फेर्नांडिस एक वेगळया भूमिकेत दिसणार आहे, बाकी कलाकाराचा शोध अजून सुरु आहे असे कळते आहे. अभिनेत्रींच्या शोधात यात बिपाशा बासू आणि डेजी शाहचे नाव चर्चेत आहे. तसेच सलमानने या चित्रपटातून जॉनला इब्राहिम बाहेरला रस्ता दाखवला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण जॉन या चित्रपटाचा भाग नाही हे कंफर्म झाल्यावर सलमानने हा चित्रपट साईन केल्याचे कळते आहे. ALSO READ : जाणून घ्या कोण आहे सलमान खानची नवी जोडीदार सध्या सलमान 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या क्लैयमॅक्सचे शूटिंग पूर्ण करत आहे. यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. तब्बल 5 वर्षानंतर सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यांचे फॅन्स हा चित्रपट बघण्यास नक्कीच उत्सुक असतील. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे. याची शूटिंग सध्या आबुधाबीमध्ये सुरु आहे. यानंतर सलमान पुढच्या महिन्यात 'रेस३'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रेसच्या आधीच्या सीरिजमध्ये सैफ अली खानने हिरोची भूमिका साकारली होती आणि याआधीचे दोन्ही चित्रपट हिट गेले होते. ट्यूबलाईट फ्लॉप झाल्यानंतर सलमान ही एक हिटच्या शोधात आहे. रेस३ नंतर सलमान किक २च्या तयारी लागणार आहे. यात पहिल्यांदाच सलमानसोबत दीपिका पादुकोण स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.