Join us

कंगनाला नवाजुद्दीनची साथ, आता त्यानेही केली बॉलिवूडबाबत 'ही' मागणी!

By अमित इंगोले | Published: October 23, 2020 10:11 AM

आता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीला आताही आपल्या कामाची मान्यता परदेशातून हवी असते आणि त्यामुळेच इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड हे बदललं पाहिजे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या काही खास कलाकारांपैकी एक नवाजुद्दीन सिद्दीकी. तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या सिनेमांऐवजी पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप लावत घटस्फोटाची मागणी केली होती. यादरम्यान नवाजचा 'सीरिअस मॅन' सिनेमा रिलीज झाला होता. अशात कंगनाने बॉलिवूडचं नाव बदललं पाहिजे असा एक सूर आवळला होता. आता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीला आताही आपल्या कामाची मान्यता परदेशातून हवी असते आणि त्यामुळेच इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूड हे बदललं पाहिजे.

'बॉलिवूड हे उधारीचं नवा'

हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना नवाजुद्दीन म्हणाला की, 'होय, माझीही इच्छा आहे की एक गोष्ट बदलली गेली पाहिजे आणि ती आहे बॉलिवूडचं नाव. हे उधारीवर घेतलेलं नाव आहे. सर्वातआधी आपल्याला ते बदललं पाहिजे'. याआधी कंगनाने ट्विटवर पोस्ट टाकून म्हणाली होती की, इंडस्ट्रीचं बॉलिवूड हे नाव बदललं पाहिजे. कारण ते हॉलिवूडचं कॉपी आहे आणि याच्या वापरावर बॅन केलं पाहिजे. (कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!)

नवाजुद्दीनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'सीरिअर मॅन'मधील त्याच्या कामाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगलंच कौतुक केलंय. नवाज म्हणतो की, बरं झालं हा सिनेमा लोकांना आवडला नाही तर इथे एखाद्या सिनेमाला बाहेर अवॉर्ड मिळाला तरच लोक म्हणतात की, चांगलं काम केलं आहे. नवाज म्हणाला की, भारतातील लोकांना आजही आपल्या कामावर परदेशी मान्यता हवी आहे आणि हे बाब अजूनपर्यंत बदलली नाही.

'बाहेरून ऑफर आहेत, पण इथे मी आनंदी आहे'

इंटरनॅशनल स्तरावर नवाजच्या सिनेमांना प्रशंसा मिळाली. पण तो म्हणतो की, 'हे खरं आहे. माझे अनेक सिनेमे इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये गेलेत. अनेक अवॉर्ड्स मिळालेत. पण तेच सिनेमे जेव्हा इथे देशात रिलीज झालेत तेव्हा त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. या सिनेमांना तेव्हा प्रतिसाद मिळाला जेव्हा त्यांना पाश्चिमात्य देशांकडून मान्यता मिळाली'. नवाज असंही म्हणाला की, त्याला बाहेरच्या सिनेमांच्या ऑफर मिळत असतात. पण तो भारतात काम करून आनंदी आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडकंगना राणौत