प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
प्रियांका चोप्राने सलमानचा 'भारत' सिनेमा सोडल्यापासून अनेक चर्चा होतायेत. प्रियांका शेवटी 2016मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या जय गंगाजलमध्ये दिसली होती. त्यानंतर ती हॉलिवूडच्या प्रोजेक्टसमध्ये बिझी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची चर्चा आहे. दिल्लीच्या इव्हेंटमध्ये प्रियांकाला हाच प्रश्न विचारला गेला. पण या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, ‘मुझे हक है’ सांगत प्रियांकाने वेगळाच सूर लावला. माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी लोकांना ठाऊक आहेत. ९० टक्के गोष्टी लोकांना माहित आहेत. उरलेल्या १० टक्के गोष्टींवर मात्र केवळ माझा आणि माझा हक्क आहे. मी एक मुलगी आहे आणि काही गोष्टी स्वत:पर्यंतचं ठेवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक गोष्टीवर खुलासा देणे मी गरजेचा मानत नाही.