Join us

अमिताभ बच्चन यांना शूटिंगसाठी पहावी लागणार वाट, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 3:45 PM

कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ व्यक्तींना होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीला चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. यासाठी 16 पृष्ठांची मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली गेली आहे. यात म्हटले आहे की, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना शूटिंग क्षेत्रात येण्याची परवानगी नसेल. कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ व्यक्तींना होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे. त्यानुसार अनेक ज्येष्ठ कलाकारांना शूटिंग करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे घरीच आराम करावा लागणार आहे. 

लवकरच 'कौन बनेगा करोडपती' शो सुरू होणार आहे. टीव्हीवर या शोचे प्रोमोदेखील झळकु लागले आहेत.यासाठी अमिताभ यांनी घरीच प्रोमो शूट केले होते. शो सुरू करण्यासाठी त्यांना सेटवरच जावे लागणार मात्र शासनाच्या नियमावलीत 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांनाही शोचे शूटिंग करता येणार नाही. अमितभ यांना काम सुरू करण्यासाठी आणखीन दोन महिने घरातच थांबावे लागणार आहे.

अमिताभ बच्चनव्यतिरिक्त अनुपम खेर, परेश रावल, अन्नू कपूर, नसीरुद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथुन चक्रवर्ती, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी डॅन्झोगप्पा, दिलीप ताहिल, टीनू आनंद, राकेश बेदी, कबीर बेदी आणि इतर कलाकार अजूनही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.यांना देखील याच नियमाचे पालन करावे लागणार आहे. 

हिंदी सिनेसृष्टीसोबत मराठी सिनेसृष्टीतही कलाकारांना चित्रपटाच्या शूटिंगपासून काही दिवस वंचितच राहावे लागणार आहे. दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश आळेकर यांनाही हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत. केवळ कलाकारासाठीच हे नियम नसून कलाक्षेत्रातील निगडीत दिग्दर्शक, लेखकही अन्य कॅटेगीरीच्याही लोकांचा यांत समावेश आहे.ज्येष्ठ कलाकारांना कोरोनाची लागण होवू नये काळजीपोटीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या