Join us

संजय कपूरची लेक शनाया कपूरलाही कोरोनाची लागण, बॉलिवूडमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:38 AM

Shanaya Kapoor Covid Positive : कोरोना काळात पार्ट्या करणं बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच भोवलं आहे. करीना कपूर च्या घरी काम करणा-या एका मोलकणीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.  

Shanaya Kapoor Covid Positive : कोरोना काळात  पार्ट्या करणं बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलंच भोवलं आहे. होय, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत जाणवू लागली आहे. अलीकडे करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघी मैत्रिणींना  कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ निर्माता सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूर यांनाही कोरोना झाला. आता संजय कपूर (Sanjay Kapoor) व महिप कपूरची (Maheep Kapoor) लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वत: ही माहिती दिली आहे.

शनायाने इन्स्टा स्टोरी पोस्ट करत करोना झाल्याची माहिती दिली आहे. ‘मी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आहे. मला सौम्य लक्षणं असली तरी मी ठीक आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. चार दिवसांपूर्वी मी कोरोनाचाचणी केली होती. त्यावेळी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण सावधगिरी म्हणून मी पुन्हा  चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला,’असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान करीना कपूर च्या घरी काम करणा-या एका मोलकणीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.  

या संक्रमणाची सुरूवात कशी झाली, हे तर माहित नाही. पण यासाठी करण जोहरच्या घरी झालेली पार्टी जबाबदार मानली जात आहे. गेल्या काही दिवसांत अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर हिच्या घरी पहिली पार्टी झाली होती. यानंतर करण जोहरच्या घरी 8 लोकांची गेट टुगेदर पार्टी आयोजित केली गेली होती. या पार्टीला मलायका अरोरा, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, करिना कपूर, महीप कपूर, सीमा खान, आलिया भट हजर होते. रियाच्या घरी झालेल्या पार्टीत मलायका, करिश्मा, अमृता, करिना, मसाबा गुप्ता आदी हजर होत्या.

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूरकोरोना वायरस बातम्या