Join us

अनेक वर्षानंतर अॅक्शन करताना दिसणार अक्षय कुमार, टायगर श्रॉफच्या 'बागी3'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 7:01 AM

टायगर श्रॉफ सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगर लवकरच स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार. नुकतेच ...

टायगर श्रॉफ सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगर लवकरच स्टुडंट ऑफ द इअर चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार. नुकतेच या चित्रपटाचे पहिल्या शेड्यूलचे शूट पूर्ण केले आहे. यात टायगर श्रॉफसोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारियासुद्धा दिसणार आहे.   टायगरच्या 'बागी 2'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याच्या आधीच निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी बागा सिरिजच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन चित्रपटाप्रमाणेच यातही मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफच दिसणार आहे. स्टुडंट ऑफ द इअरची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर 'बागी 3'च्या शूटिंगला टायगर सुरुवात करणार आहे.  अजूनपर्यंत यात टायगरच्या अपोझिट कोण झळकणार या गोष्टीचा खुलासा झालेला नाही. एक इव्हेंट दरम्यान अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचे साजिदने सांगितले होते आणि लवकरात लवकर तो तिच्या नावाची घोषणा करणार असल्याचे ही तो म्हणाला होता. अभिनेत्रीच्या नावाची घोषणा जरी अजून झालेली नसली तर यात टायगरसोबत अजून एक अभिनेता दिसणार असल्याचे समजते आहे.  स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार यात अक्षय कुमारही सुद्धा दिसणार आहे. रिपोर्टनुसार बागी 3 ला अपार यश मिळू शकते आणि निर्मात्याला या चित्रपटाला हिट करायचे आहे त्यामुळे यात अक्षयला सुद्धा घेण्यात येणार आहे. जर अक्षयने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला तर टायगर आणि अक्षयची जोडी मिळून बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवू शकते.  ALSO READ :  ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’च्या सेटवरील एक फोटो होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!अक्षयकुमार त्याच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. ‘केसरी’ पुढच्या वर्षी होळीनिमित्त प्रदर्शित केला जाणार आहे.