Join us  

लग्ननंतर करिअर कधीच संपत नसते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2016 12:01 PM

बेनझीर जमादार काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे मिसेस इंडिया अर्थ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार ...

बेनझीर जमादार
 
काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे मिसेस इंडिया अर्थ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातून पाच हजार महिलांनी अर्ज केला होता. यापैकी ४१ महिलांनी अंतिम फेरी गाठली होती. या अंतिम फेरीमध्ये पुण्यामध्ये राहणारी प्रीनित ग्रेवाल हिने मिसेस इंडिया अर्थचा क्राऊन जिंकला. तिच्या या प्रवासाबद्दल प्रीनितने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या मनमोकळया गप्पा. 
 
देशभरातून ५ हजार महिलांमधून तू हा मिसेस इंडिया अर्थचा यशस्वी क्राऊन प्राप्त केला यावेळी तुझ्या भावना काय होत्या?
ज्यावेळी मिसेस इंडिया अर्थ म्हणून माझे नाव घेण्यात आले. त्यावेळी काहीकाळ माझा विश्वास बसत नव्हता. पण खरंच खूप आनंदाचा क्षण होता तो.  मी कधी विचार ही केला नव्हता, हा क्राऊन मला मिळेल. मी फक्त एक अनुभव घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाले होते. आज हा क्राऊन जिंकल्यानंतर माझा कुटुंबाला माझा अभिमान वाटतो आहे. 
 
लग्नानंतर ही या ग्लॅमरस स्पर्धेत सहभागी झाली याविषयी तुझ्या कुटुंबाचा सपोर्ट कसा होता?
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. कारण माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही कुटुंबाचा मला पाठिंबा होता. माहेरी मला मुलगी  म्हणून कधीच दुहेरी वागणूक दिली गेली नाही तर सासरी आल्यानंतर माझ्यावर कोणतीच बंधन लादण्यात आली नाहीत. सासरच्यांनी मला माझ्या करिअरसाठी नेहमी प्रोत्साहन दिले. आज जे काही यश मला मिळाले आहे त्यात दोन्ही कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झाले.
 
लग्न झाले म्हणजे करिअर संपले असा काहीसा समज मुलींमध्ये निर्माण झाला आहे अशा मुलींना तू काय सांगू इच्छिते?
करिअरमध्ये लग्न ही कधीच बाधा ठरत नाही. कारण शादी ये चाहो तो दिवार बन सकती, चाहो तो दरवाजा ही बन सकता है. लग्नानंतर करिअर संपत ही म्हणणे चुकिचे आहे. तुम्ही घर आणि करिअर कसे सांभाळता हे तुमच्यावर आहे. तसंच कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना स्वत:च्या स्वप्नांचा देखील विचार करा हे मी नक्की सांगेन. 
 
मिसेस इंडिया अर्थच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
खरे सांगू का मी फूल टाइम जॉब करते. त्यामुळे मिसेस इंडिया अर्थच्या तयारीसाठी मला खूप वेळ मिळाला नाही. मी जास्त काही अभ्यास करू शकले नाही. पण माझ्याबरोबर त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांनी बरीच तयारी केली होती. त्यांनी मिसेस इंडिया अर्थमध्ये सहभागी होण्याआधी ट्रेनिंग वगैरे घेतले होते. मी फक्त यू टयूब आणि गूगलवर बघून सर्व शिकले होते. 
 
पुढच्या स्पर्धेसाठी काय तयारी केली आहे का?
हो, पुढची स्पर्धा ही अमेरिकेत आहे. या स्पर्धेत मी भारताचे प्रातिनिधित्व करणार आहे. त्यामुळे पूर्ण अभ्यास करुनच मी या स्पर्धेत सहभागी होईन. तसेच देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते या गोष्टीचा खूप आनंद होत आहे.