बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान लवकरच तुम्हाला एक आयटम नंबर करताना दिसणार आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. मलायका विशाल भारव्दाज यांच्या पटाखा सिनेमामध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टरमध्ये मलायका खूपच हॉट दिसतेय. हा फोटो शेअर करताना मलायकाने एक पोस्ट देखील लिहिली आहे, ''हॅलो, हॅलो, हॅलो, दोन दिवसांत सगळे म्हणतील.'' या गाण्याचे बोल ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी लिहिले आहेत तर कोरियॉग्राफी गणेश आचार्यने केली आहे. मलायकाने पहिलं आयटम साँग शाहरुख खानसोबत दिलसे सिनेमात 'छैंया-छैंया' केले होते तर दबंगमध्ये ती मुन्नी बदनाम हुई' गाण्यावर थिरकली होती. फिटनेसच्या बाबतीत मलायका आजच्या अनेक अभिनेत्रींना फिटनेसमध्ये टक्कर देते. एक दिवसही ती जीमला जाणं स्किप करत नाही.
विशाल भारव्दाज यांचा 'पटाखा सिनेमा चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहे. बडकी आणि छुटकी नावाच्या दोन बहिणी नेहमी एकमेकींशी भांडत असतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांना कळते की त्या एकमेकींशिवाय राहु शकत नाही. हा एका कॉमेडी-ड्रामा सिनेमा असणार आहे. यात प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरला 'पटाखा' रिलीज होणार आहे.