Join us

​ब्रेकअपच्या बातमीनंतर अभिनेता राहुल खन्नाला चाहत्यांनी दिल्या टीप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 11:55 AM

बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांचा लहान मुलगा व बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा भाऊ अशी ओळख असलेला अभिनेता राहुल खन्ना ...

बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांचा लहान मुलगा व बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा भाऊ अशी ओळख असलेला अभिनेता राहुल खन्ना सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतेच राहुल खन्नाने ट्विटरवरून आपले एक गुपित उघड केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या रिलेशनशीपचा खुलासा करताना राहुल खन्ना याने, ‘मागील 20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप झाला असल्याची माहिती दिली. यानंतर त्याचे हे ट्विट सर्वाधिक ट्रेंडिग केले जात आहे. एबीपी या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, राहुल खन्नाने आपल्या ब्रेकअपची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. मात्र सोशल मीडियावर राहुल खन्नाला असलेली मोठी फॅन फॉलोविंग त्याची डोकेदुखी ठरली आहे. त्याच्या या ट्विटवर त्याच्या अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त करत त्याला काही सल्लेही दिले आहेत. अभिनय क्षेत्रात नशिब आजमावता न आल्याने त्याने ब्लॉगलेखन सुरू क रणाºया राहुलची त्याची विनोदी लेखनशैली प्रसिद्ध आहे. याशिवाय तो आघाडीच्या अनेक मासिकांसाठी लेखनही करतो.राहुलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आतापर्यंत फारशी चर्चा झालेली नाही. तो कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे की त्याचं लग्न झालं आहे, याविषयी आतापर्यंत फारशी कोणाला खबरबात नव्हती. मात्र अचानक त्याने आपल्या दोन दशकांच्या अफेअरची अखेर झाल्याचा बॉम्ब टाकला आणि सगळेच अवाक झाले.विशेष म्हणजे राहुल खन्नाच्या चाहत्यांनी त्याला ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही टिप्सही दिल्या. चॉकलेट खाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अनेक सल्ले राहुलला देण्यात आले आहेत. १९४७ अर्थ, बॉलिवूड हॉलिवूड, ऐलान, दिल कबड्डी, लव्हा आज कल, वेक अप सिद यासारखे राहुलचे सिनेमे गाजले आहेत. मात्र त्याला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळविता आले नाही. }}}} ">http://