Join us  

OTTनंतर जुनैद खान झळकणार रुपेरी पडद्यावर, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 4:21 PM

Junaid Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खानने २०२४ साली 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले होते. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता जुनैद खान दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा मुलगा जुनैद खान(Junaid Khan)ने २०२४ साली 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले होते. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता जुनैद खान दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शीर्षक अद्याप समजू शकलेले नाही. पण नायिकेचे नाव कळले आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.

जुनैद खानचा दुसरा चित्रपट रोमँटिक-ड्रामा असेल, ज्यामध्ये तो खुशी कपूरसोबत दिसणार आहे. जुनैद खानच्या चित्रपटाची घोषणा फँटम एंटरटेनमेंटच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये जुनैद खान आणि खुशी कपूर यांची प्रमुख कलाकार म्हणून नावे लिहिली आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

जुनैद खान दिसणार खुशी कपूरसोबत या चित्रपटात खुशी कपूर आणि जुनैद खान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. अद्वैत चंदनने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी अद्वैतने ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दोन्ही सिनेमांमध्ये त्याने जुनैद खानचे वडील आमिर खानसोबत काम केले होते.

तमीळ चित्रपटाचा हिंदी रिमेक?हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, जुनैद खान आणि खुशी कपूर यांनी मुंबईत चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. त्याचबरोबर या दोघांनी दिल्लीत चित्रपटाचे काही भाग शूटही केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुनैद खान आणि खुशी कपूरचा हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या तमिळ 'लव्ह टुडे'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट प्रदीप रंगनाथन यांनी दिग्दर्शित केला होता.

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला पहिला चित्रपटजुनेद खानचा पहिला चित्रपट 'महाराज' ओटीटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकार करसनदास मुलजी यांची भूमिका साकारली होती. ‘महाराज’ चित्रपटाची कथा १८६२ सालच्या प्रसिद्ध महाराज बदनामीच्या प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​यांनी केले होते.

टॅग्स :आमिर खान