Join us

प्रीती झिंटानंतर Salman Khan होणार बाबा? लग्नाआधीच दोन मुलांचं प्लानिंग? चर्चा तर हीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 4:53 PM

अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी सरोगसीव्दारे आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित पुढचा नंबर भाईजानचा आहे...!!

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा (Preity Zinta) सरोगसीच्या मदतीने दोन मुलांची आई झाली. जिया आणि जय अशी तिच्या जुळ्या मुलांची नाव आहेत. प्रीतीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि सोबतच पुढचा नंबर कोणाचा? असा प्रश्नही विचारल्या जातोय. गेल्या काही वर्षांत सरोगसीद्वारे आई-बाबा बनण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतो आहे. गौरी खान- शाहरूख खान, किरण राव -आमिर खान, करण जोहर, एकता कपूर, तुषार कपूर, शिल्पा शेट्टी, प्रीति झिंटा आणि आता पुढचा नंबर कोणाचा तर सलमान खानचा (Salman Khan). धक्का बसला ना? पण सोशल मीडियावर सध्या हीच चर्चा आहे. अर्थात ही चर्चा उगाच नाही तर खुद्द सलमान अलीकडे असं काही बोलला की, त्यावरून हा अंदाज बांधला जातोय.

अलीकडे ‘बिग बॉस 15’च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी ‘बंटी और बबली 2’च्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी राणी सलमानच्या मुलाबद्दल बोलली. सलमान, मी गेल्यावेळी आले होते तेव्हा मला मूल होणार असल्याचं तू म्हणाला होता, ते मूल कुठं आहे? असं राणी  सलमानला विचारते. यावर ते मूल सध्या प्रोसेसमध्ये आहे, असं सलमान हसत हसत म्हणतो. त्याच्या या उत्तरावर राणी हसते आणि मला हे ऐकून दु:ख होतंय. पण ‘बंटी और बबली 3’ येईपर्यंत प्लानिंग व्हायला हवी, असं सलमानला म्हणते. यावर तोपर्यंत एक नाही, दोन होतील. बंटी और बबली दोन्ही होतील, असं सलमान म्हणतो.

याआधीही सलमान मुलांबद्दल बोलला होता. मी लग्न करणार की नाही, हे माहित नाही. पण मी बाबा नक्की बनणार, असं तो एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर म्हणाला होता.   फिल्मफेअरला दिलेला एका मुलाखतीतही तो यावर बोलला होता. ‘मला नाही वाटत आता माझं लग्न होईल, ती वेळ निघून गेली आहे. पण जेव्हा मी 70 वर्षांचा असेल तेव्हा माझी मुले 20 वर्षांची असेल. येत्या 2 ते 3 वर्षांत मला मुलं हवी आहेत. कारण माझ्या आई-वडिलांनी माझी मुलं पाहायची आहेत,’ असं तो म्हणाला होता.याचवरून सलमान सरोगसीद्वारे बाबा बनणार, अशी शक्यता वर्तवली जातेय.

टॅग्स :सलमान खानप्रीती झिंटा