साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिचे लाखो दिवाने आहेत. ‘पुष्पा’ या सिनेमानंतर तर रश्मिकांच्या चाहत्यांची संख्या आणखीच वाढली आहे. ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) इतकीच रश्मिका सुद्धा ‘हिट’ झाली. साऊथचे चाहते आधीच तिच्या प्रेमात होते. ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर हिंदी भाषिकही तिच्या प्रेमात पडले. आता ‘पुष्पा’नंतर रश्मिकाच्या हाती आणखी एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. होय, रामचरणच्या (Ram charan) एका बिग बजेट सिनेमात रश्मिकाची वर्णी लागल्याची चर्चा आहे.
टॉलिवूडच्या ताज्या रिपोर्टनुसार, रामचरणच्या ‘आरसी 16’ यात रश्मिका लीड अॅक्ट्रेस म्हणून दिसणार आहे. रश्मिकाने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळतेय. अर्थात अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही.
गेल्यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर रामचरणच्या ‘आरसी 16’ या सिनेमाची घोषणा झाली होती. पण या चित्रपटाचं नाव फायरल झालेलं नाही. गौतम तिन्नुरी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटासाठी मेकर्स दिर्घकाळापासून लीड अॅक्ट्रेस शोधत होते. आता कदाचित हा शोध संपला आहे.रश्मिका ‘पुष्पा’च्या दुस-या पार्टमध्येही दिसणार आहे. पहिल्या पार्टसाठी तिला 2 कोटी फी मिळाली होती. दुस-या पार्टसाठी ती 3 कोटी फी घेणार असल्याचे कळतंय. लवकरच बॉलिवूडच्या सिनेमातही रश्मिका झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभसोबत गुडबाय या दोन चित्रपटांचं शेड्यूल तिने पूर्ण केलं आहे.
रामचरणबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘आरआरआर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रामचरणचा ‘आचार्य’ देखील रिलीजसाठी सज्ज आहे. जो एप्रिलमध्ये रिलीज होऊ शकतो.