मुंबई - व्यवसायिक राज कुंद्राच्या अटकेनंतर, आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी होऊ शकते. याची तयारीही मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 14 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असूनही, शिल्पा शेट्टीच्या वाढत्या संपत्तीचे कारण तिची राज कुंद्रासोबत असलेली व्यवसायिक भागिदारी आहे. शिल्पा शेट्टी यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरूनही कमाई करते. याशिवाय, तिच्याकडे जवळपास एक डझन ब्रँड एंडोर्समेंट असल्याचेही बोलले जाते. (After Raj kundra arrest shilpa shetty can be summoned by mumbai police)
मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या सर्वच व्यवसायिक संबंधांत शिल्पा शेट्टीचेही नाव आहे. ज्या अॅपच्या माध्यमाने अनेक अभिनेत्रींच्या न्यूड व्हिडिओजचे संपूर्ण जगात प्रसारण केले गेले, त्याच प्रकारे राज कुंद्राचे अॅप जेएल 50 च्या प्रचार व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. ती राज कुंद्रासोबत राजस्थान रॉयल्स नावाच्या आयपीएल क्रिकेट टीममध्येही सामील होती आणि ज्या सतयुग गोल्ड नावाच्या कंपनीविरोधात सचिन जोशीने तक्रार केली होती. त्यातही शिल्पा भागिदार आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या जुन्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या जुन्या पोस्ट मुंबई पोलीसांनीही आपल्या चौकशीत सामिल केल्या आहेत. याशिवाय, शिल्पा शेट्टीने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मआधी अथवा बरोबर नंतर, ज्या पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केल्या आहेत, त्यांवरही पोलिसांचे लक्ष आहे. कायद्यानुसार, सरोगेसी एखाद्या क्लिनिकच्या प्रचार आणि प्रसारासाठी वापरले जाऊ शकत नाही.
पोर्नोग्राफी प्रकरणात क्राइम ब्रांचला मोठं यश; राज कुंद्रानंतर, आता 'या' व्यक्तीला केली अटक
जेव्हा-जेव्हा राज कुंद्रा वादात अडकतो, तेव्हा तेव्हा शिल्पा शेट्टीच्या ब्रँड एंडोर्समेंटची संख्याही वाढते, अशी माहितीही मुंबई पोलिसांना मिळाली आहे. ते या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत. एवढेच नाही, तर राज कुंद्राच्या सोशल मिडिया ब्रँडिंग करणाऱ्या टीमचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.