रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ताज्या न्यूड फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकतंच रणवीरने ‘पेपर’ मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं. त्याच्या या फोटोशूटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. रणवीरच्या न्यूड फोटोंची चर्चा थांबते ना थांबते तोच आता आणखी एका साऊथ अभिनेत्याने स्वत:चे न्यूड फोटो शेअर करत, सर्वांना हैराण केलं आहे. हा अभिनेता कोण तर बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा (Jwala Gutta) पती व तामिळ अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal).विष्णू विशाल या फोटोंमध्ये बेडवर वेगवेगळ्या पोझ देताना दिसून येत आहे. विष्पणूचे हे फोटो सेमी न्यूड आहेत. त्याने अंगावर पांढरी चादर घेतली आहे. इन्स्टाग्रामवर विष्णूने हे फोटो शेअर केलेत.
‘वेल, जॉइनिंग ट्रेंड’ असं लिहित त्याने हे फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो त्याची पत्नी ज्वाला गुट्टाने क्लिक केले आहेत. त्याने स्वत: कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यात ज्वाला व विष्णू विशाल लग्नबेडीत अडकले होते. अभिनेता होण्याआधी विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता. कदाचित खेळ हाच प्रेमातील दुवा ठरला आणि ज्वाला व विष्णु एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाआधी दीर्घकाळ विष्णू व ज्वाला एकमेकांना डेट करत होते. 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.
ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिने कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, तसेच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत. विष्णू विशालला तर दक्षिण चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. पण तो एक क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आपलं नाव बदलून विष्णू असं नवं नामकरण केलं आता तो प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्वाला गुट्टाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदसोबत लग्न केलं होतं. मात्र 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. विष्णूचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे. याआधी त्यानं रजनी नटराजन सोबत लग्न केलं होतं. मात्र नंतर ते विभक्त झाले.