सुशांत सिंह राजपूत केससंबंधी ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर ४ जणांचा जामिन अर्ज फेटाळला त्या दिवशी मुंबई सत्र न्यायालयाने एक खुलासा करत सर्वांना धक्का दिलाय. एनसीबीसोबत चौकशी दरम्यान रियाने खुलासा केला की, अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्री सिंह, डिझायनर सिमोन खंबाटा, सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यर आणि निर्माता मुकेश छाब्राही ड्रग्स टीममध्ये सहभागी होते.
जेव्हापासून ही नावे समोर आलीत तेव्हापासून सोशल मीडिया यूजर्स यांच्यावरून मजेदार मीम्स शेअर करत आहे. सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे सोशल मीडियावर ट्रेन्ड करत आहेत. सोबतच अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.
याआधी सूत्रांनी दावा केला होता की, NCB च्या चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधील काही नावांचा खुलासा केला होता. जे ड्रग्सचं सेवन करत होते आणि खरेदी करत होते. यात जवळपास २५ लोकांची नावे असल्याचे समजते.
दरम्यान, रिया आणि इतर ५ आरोपींना जामिनासाठी बॉम्बे हाय कोर्ट स्थानांतरित करण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या बांद्र्यांतील घरात मृत आढळून आला होता. या केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान ड्रग्सचं प्रकरण समोर आलं असून एनसीबी तपास करत आहे.
हे पण वाचा :
रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन!
सुशांतच्या घरून रियाने स्वतःच्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा, कारण...!
पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर !